ContactContact

SitemapSitemap

A-Z ListA-Z List

 

Admissions
Examination
Finance & Accounts
Administration
Research

 

Syllabi
Scholarships
Sports Section
Certificate Section
Library

 

SET Examination
Academic Calendar
Seminar & Conferences
Tenders
Circulars

 

Job Openings
Vidyavani
NSS
International Centre
Students Welfare

 
     
     
 University Ranking



'टाइम्स हायर एज्युकेशन' या जागतिक मानांकनानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात सातव्या क्रमांकावर...

पारंपारिक विद्यापीठांमध्ये संयुक्तरीत्या पहिले स्थान

'टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग' या प्रतिष्ठेच्या मानांकनाचा ताजा अहवाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात संयुक्तरीत्या सातवा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे पारंपारिक विद्यापीठांमध्ये ते देशात संयुक्तरीत्या पहिला क्रमांकावर आहे. वरच्या सहा संस्थांमध्ये बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस आणि पाच आयआयटी यांचा समावेश आहे.

'टाइम्स हायर एज्युकेशन' यांच्या वतीने जगभरातील उच्चशिक्षण संस्थांच्या दर्जाचे मानांकन केले जाते. त्यानुसार पहिल्या १००० विद्यापीठांची नावे जाहीर केली जातात. त्यात प्रामुख्याने अध्यापन, संशोधन, ज्ञानप्रसार, आंतरराष्ट्रीय भान असे निकष पाहिले जातात. हे मानांकन जगभरात प्रतिष्ठेचे मानले जाते. या संस्थेने २०१८ साठीची क्रमवारी नुकतीच जाहीर केली. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशातील इतर उच्चशिक्षण संस्था व विद्यापीठांच्या तुलनेत मोठी प्रगती साधल्याचे पाहायला मिळाले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्याच वर्षी 'नॅशनल इन्स्टिट्यूशलन रँकिंग फ्रेमवर्क'ने जाहीर केलेल्या (एनआयआरएफ) क्रमवारीत विद्यापीठाचा दहावा क्रमांक आला होता. आता विद्यापीठाने आणखी प्रगती केल्याचे 'टाइम्स हायर एज्युकेशन'च्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याच मूल्यांकनात देशातील पारंपारिक विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २०१६ मध्ये तिसरा, तर २०१७ मध्ये दुसरा क्रमांक आला होता. त्यात सुधारणा होऊन आता २०१८ साठी विद्यापीठाने संयुक्त पहिला क्रमांक पटकावला आहे.

भारतातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (आयआयएस्सी) पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मुंबई, दिल्ली, कानपूर, खरगपूर, रूर्की या पाच ठिकाणच्या इंडियन इन्स्टिट्यूज ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) यांचा समावेश आहे. सातव्या क्रमांकावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह कानपूर, मद्रास, रूरकेला येथील आयआयटी, दिल्ली विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, पंजाब विद्यापीठ, जादवपूर विद्यापीठ, इंडियन स्कूल ऑफ माइन्स यांचा समावेश आहे. एकूण मूल्यांकनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला गेल्या वर्षी २७.५ गुण होते. त्यात वाढ होऊन यावर्षी ३०.६ गुण मिळाले आहेत. तसेच, अध्यापन (टिचिंग), उद्योगांसोबतची मिळकत, सायटेशन या निकषांमध्येही विद्यापीठाने यावर्षी प्रगती साधली आहे.

मा.कुलगुरू यांची प्रतिक्रिया...

उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्याच वर्षी 'नॅशनल इन्स्टिट्यूशलन रँकिंग फ्रेमवर्क'ने जाहीर केलेल्या (एनआयआरएफ) क्रमवारीत विद्यापीठाचा दहावा क्रमांक आला होता. आता विद्यापीठाने आणखी प्रगती केल्याचे 'टाइम्स हायर एज्युकेशन'च्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याच मूल्यांकनात देशातील पारंपारिक विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २०१६ मध्ये तिसरा, तर २०१७ मध्ये दुसरा क्रमांक आला होता. त्यात सुधारणा होऊन आता २०१८ साठी विद्यापीठाने संयुक्त पहिला क्रमांक पटकावला आहे.

डॉ. नितीन करमळकर,
(कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)


 

 

 

 

 

 

Savitribai Phule Pune University. All Rights Reserved.

Copyright | Disclaimer | Privacy Statement |

Trade Marks used in this website (other than Savitribai Phule Pune University and its Departments) belong to the respective owners.

Website Maintained By :
Vertex